bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 23
Proverbs 23
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 24 →
1
अधिपतीबरोबर भोजनास बसतोस तेव्हा तुझ्यापुढे कोण आहे ह्याचा पूर्ण विचार कर;
2
तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.
3
त्याच्या मिष्टान्नांची इच्छा करू नकोस; ती कपटाची खाद्ये आहेत.
4
धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव.
5
जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.
6
दुष्टदृष्टी मनुष्याचे अन्न खाऊ नकोस. त्याच्या मिष्टान्नाची इच्छा करू नकोस;
7
कारण तो आपल्या मनात घास मोजणार्यासारखा आहे, तो तुला “खा, पी” म्हणतो, पण त्याचे मन तुझ्यावर नाही.
8
गिळलेला घास तू ओकून टाकशील, तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल,
9
मूर्खाच्या कानात काही सांगू नकोस तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानील.
10
जुनी मेर सारू नकोस; अनाथांच्या शेतात शिरू नकोस;
11
कारण त्यांचा कैवारी समर्थ आहे; तो त्यांचा कैवार घेऊन तुझ्याविरुद्ध होईल.
12
तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
13
मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही.
14
तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव.
15
माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असले तर माझ्या, माझ्याच चित्ताला आनंद होईल;
16
तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझे अंतर्याम उल्लासेल.
17
पातक्यांचा हेवा करू नकोस तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग;
18
कारण पारितोषिक निश्चये मिळणार; तुझी आशा नष्ट होणार नाही.
19
माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गात राख.
20
मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्यास उभा राहू नकोस;
21
कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवतो,
22
तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.
23
सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.
24
नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो.
25
तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो,
26
माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.
27
वेश्या खोल खाचेसारखी आहे; परस्त्री अरुंद कूपासारखी आहे.
28
ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
29
हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करतो? भांडणतंट्यात कोण पडतो? गार्हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते?
30
जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या.
31
द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस.
32
शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो.
33
तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील;
34
समुद्रामध्ये आडवा पडलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखी तुझी स्थिती होईल.
35
तू म्हणशील, “त्यांनी मला ताडन केले तरी माझे काही दुखले नाही, त्यांनी मला मारले तरी मला काही लागले नाही; मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 24 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31