bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 3
Proverbs 3
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 4 →
1
माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत;
2
कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील.
3
दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव;
4
म्हणजे तुला देव व मनुष्य ह्यांच्याकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील.
5
तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
6
तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.
7
तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.
8
हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्त्व असे होईल.
9
तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;
10
म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील.
11
माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस;
12
कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.
13
ज्याला ज्ञान प्राप्त होते, तो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय.
14
कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे.
15
ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही.
16
त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत;
17
त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत.
18
जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.
19
परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले.
20
त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले, व आकाश दहिवर वर्षते.
21
माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नकोस; तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव.
22
म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील.
23
तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही.
24
तू निजतेवेळी भिणार नाहीस; तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल,
25
तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिऊ नकोस, दुष्टांची धाड आली तरी भिऊ नकोस;
26
कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही.
27
एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नकोस.
28
एखादी वस्तू तुझ्याजवळ असता आपल्या शेजार्याला असे सांगू नकोस की, “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन.”
29
तुझा शेजारी तुझ्याजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नकोस.
30
एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नकोस.
31
जुलूम करणार्यांशी स्पर्धा करू नकोस. त्याची कोणतीही रीत स्वीकारू नकोस.
32
कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.
33
परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण नीतिमानांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो.
34
उपहास करणार्यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करतो.
35
ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31