bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 12
Proverbs 12
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 13 →
1
ज्याला ज्ञान प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय.
2
सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणार्याला तो दोषी ठरवतो.
3
मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही.
4
सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे.
5
नीतिमानांचे विचार यथान्याय असतात; दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात.
6
दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांना सोडवील.
7
दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु नीतिमानांचे घर टिकते.
8
मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.
9
जो आपणास प्रतिष्ठित समजतो पण अन्नाला मोताद असतो त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजायचा.
10
नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते.
11
जो आपले शेत स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते. परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय.
12
दुष्ट लोकांना मिळणार्या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानांचे मूळ फळ देते.
13
मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो.
14
आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते.
15
मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो.
16
मूर्खाची तळमळ तत्काळ कळते; शहाणा आपली लाज झाकून ठेवतो.
17
ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो.
18
कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.
19
सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे.
20
वाईट योजणार्यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्यांच्या मनात हर्ष असतो.
21
नीतिमानाला विपत्ती येत नाही, पण दुर्जन अरिष्टांनी व्याप्त होतील.
22
असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात.
23
शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते.
24
उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते.
25
मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.
26
नीतिमान आपल्या शेजार्याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांना बहकावतो.
27
आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे.
28
न्याय्यत्वाच्या मार्गात जीवन आहे; त्याच्या वाटेत मरण नाही.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31