bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 25
Proverbs 25
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 24
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 26 →
1
हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला.
2
एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे ह्यात राजांचा गौरव आहे.
3
उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा, व राजांच्या मनाचा थांग लागत नाही.
4
रुप्यातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळणार्यासाठी त्याचे चांगले पात्र बनते.
5
राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन नीतिमत्तेच्या ठायी स्थापित होईल.
6
राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नकोस; थोर लोकांच्या जागी उभा राहू नकोस;
7
कारण कोणा सरदारास येताना पाहून त्याच्यासमोर तुला खालच्या जागी बसवण्यात यावे, त्यापेक्षा “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे बरे.
8
फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.
9
तुझा व तुझ्या शेजार्याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस;
10
फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील.
11
रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.
12
सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्या कानाला आहे.
13
कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्याला पाठवणार्याला आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
14
मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे.
15
बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.
16
मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल.
17
शेजार्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.
18
जो शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे.
19
संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे.
20
थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे.
21
तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे;
22
असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.
23
उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.
24
भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले.
25
तान्हेल्या जिवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय.
26
दुर्जनापुढे स्थानभ्रष्ट झालेला नीतिमान हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड ह्यांप्रमाणे आहे.
27
मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही.
28
ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.
← Chapter 24
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 26 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31