bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 18
Proverbs 18
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 19 →
1
जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.
2
मूर्खाला समंजसपणात संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रकट करण्यातच त्याला संतोष वाटतो.
3
जेथे दुष्ट तेथे तिरस्कार, आणि जेथे अधमता तेथे निंदा.
4
मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत.
5
दुर्जनाचा पक्ष धरून नीतिमानाचा न्याय विपरीत करणे उचित नाही.
6
मूर्ख कलहाला तोंड देतो; त्याचे मुख चापटीला आमंत्रण करते.
7
मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय.
8
कानास लागणार्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात.
9
आपल्या कामात हयगय करणारा, नासधूस करणार्याचा भाऊ होय.
10
परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.
11
धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.
12
नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.
13
ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.
14
मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करते; पण व्याकूळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल?
15
सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते; शहाण्याचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात.
16
लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करते, व त्याला बड्या लोकांसमोर नेते.
17
जो आपला दावा प्रथम मांडतो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावतो.
18
चिठ्ठ्या टाकल्याने झगडे मिटतात, व झुंजार भिडण्याचे राहतात.
19
दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.
20
मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात; त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे.
21
जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.
22
ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
23
निर्धन विनवण्या करतो, पण धनवान निष्ठुरपणाचे उत्तर देतो.
24
जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31