bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 21
Proverbs 21
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 22 →
1
राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.
2
मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.
3
नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.
4
चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत.
5
उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.
6
असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.
7
दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात.
8
अपराधांचा भार वाहणार्याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते.
9
भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले.
10
दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजार्यावर तो कृपादृष्टी करीत नाही.
11
निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो; सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञान पावतो.
12
न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तींत पाडतो.
13
गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.
14
एकान्ती दिलेली देणगी राग शमवते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमवते.
15
न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्यांचा त्यामुळे नाश होतो.
16
ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल.
17
ज्याला ख्यालीखुशाली आवडते तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षारसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही.
18
नीतिमानाची खंडणी दुर्जन, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.
19
भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला.
20
सुज्ञांच्या घरात मोलवान वस्तू व तेल ह्यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवतो.
21
जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात.
22
सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
23
जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो, तो संकटांपासून आपला जीव बचावतो.
24
गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.
25
आळश्याची वासना त्याला मारून टाकते; कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात.
26
कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही;
27
दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?
28
खोटा साक्षी नाश पावतो, पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही.
29
दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो.
30
परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.
31
लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 22 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31