bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 20
Proverbs 20
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 21 →
1
द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.
2
राजाचा दरारा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याला जो राग आणतो तो आपल्या जिवाविरुद्ध पाप करतो.
3
भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो.
4
हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही.
5
मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.
6
दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?
7
जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.
8
राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो.
9
“मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल?
10
वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे.
11
वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.
12
ऐकणारे कान व पाहणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वराने केले.
13
निद्राप्रिय होऊ नकोस, झालास तर भिकेला लागशील; आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल.
14
“हे पसंत नाही, ते पसंत नाही,” असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारतो.
15
सोने आहे व मोतीही विपुल आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे.
16
जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव.
17
लबाडीची भाकर मनुष्याला गोड लागते, पण मग त्याच्या तोंडात माती पडते.
18
प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो; शहाणपणाने मार्गास लागून युद्ध चालव.
19
जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, म्हणून बडबड करणार्याची संगत धरू नकोस.
20
जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल.
21
आरंभी उतावळीने मिळवलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही.
22
“वाइटाचा बदला मी घेईन” असे म्हणू नकोस; परमेश्वरावर भरवसा ठेवून राहा म्हणजे तो तुला साहाय्य करील.
23
वजनावजनांत फरक असणे ह्याचा परमेश्वराला वीट आहे, आणि खोटी तागडी बरी नाही.
24
मनुष्याचे जाणेयेणे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल?
25
“हे पवित्र आहे,” असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे, हे मनुष्याने पाशात पडणे होय.
26
सुज्ञ राजा दुर्जनांना पाखडून टाकतो, त्यांच्यावर चाक फिरवून त्यांची मळणी करतो.
27
मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो.
28
दया व सत्य ही राजाचे रक्षण करतात; तो दयेने आपले सिंहासन दृढ करतो.
29
बल हे तरुणांना भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.
30
जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात.
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 21 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31