bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Proverbs 15
Proverbs 15
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 16 →
1
मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.
2
सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.
3
परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.
4
जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते.
5
मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो; वाग्दंड लक्षात ठेवतो तो शहाणा होतो.
6
नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते; दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो.
7
ज्ञान्यांची वाणी विद्येचा प्रसार करते; मूर्खांचे हृदय स्थिर नसते.
8
दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.
9
दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे.
10
जो सन्मार्ग सोडतो त्याला भारी शासन होते; जो वाग्दंडाचा तिटकारा करतो तो मरेल.
11
अधोलोक आणि विनाशस्थान1 ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत; तर मग मनुष्यजातीची अंत:करणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत!
12
निंदकाला वाग्दंड आवडत नाही; तो ज्ञान्यांकडे जात नाही;
13
आनंदी मनाने मुख प्रसन्न होते; मनातील खेदाने हृदय भंग पावते.
14
बुद्धिमानाचे मन ज्ञानाचा शोध करते; मूर्खाचे मुख मूर्खता भक्षते;
15
दु:खग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते.
16
बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे;
17
पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागवणे, ह्यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.
18
तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो;
19
आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी असते, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
20
शहाणा मुलगा बापाला आनंद देतो; मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो;
21
बुद्धिहीन इसम मूर्खपणात आनंद मानतो. समंजस मनुष्य सरळ मार्गाने जातो.
22
मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.
23
मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!
24
सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.
25
परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीनदोस्त करतो, पण विधवेची मेर कायम राखतो.
26
परमेश्वराला दुष्ट कल्पनांचा वीट आहे, पण ममतेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत.
27
धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो.
28
नीतिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते.
29
परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.
30
नेत्रांचे तेज अंत:करणाला उल्लास देते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.
31
जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो.
32
जो शिक्षण अव्हेरतो तो आपल्या जिवाला तुच्छ लेखतो; जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.
33
परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय; आधी नम्रता मग मान्यता.
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 16 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31